इ श्रम कार्ड ऑनलाईन मिळवा
महानोंदणी असंघटित कामगारांची
सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान, कौशल्य योजना देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून देशातील असंघटित कामगार नोंदणीचा "महामहोत्सव" सुरु झाला आहे.
असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत
१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर २. पशुपालन करणारे ३. विडी कामगार ४. बांधकाम कामगार ५. सेंट्रिंग कामगार ६. लेदर कामगार ७. सुतार ८. वीटभट्टीवर काम करणारे ९. न्हावी १०. घरगुती कामगार ११. भाजीपाला विक्रेते १२. फळ विक्रेते १३.वृत्तपत्र विक्रेते १४. हातगाडी ओढणारे १५. ऑटो रिक्षा चालक १६. घरकाम करणारे कामगार १७. आशा कामगार १८. दूध उत्पादक शेतकरी 19. सामान्य सेवा केंद्राचालक 20. स्थलांतरित कामगार
फायदे :
यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.
पात्रता :
१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी २. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी ३. ती व्यक्ती EPFO व ESIC ची सदस्य नसावी ४. वरील कामगार क्षेत्रात काम करणारी असावी
इ श्रम नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
१. आधार कार्ड २. मोबाइल नंबर ३. बँक पासबुक
ऑनलाइन करणेचे टप्पे
श्रम एवं रोजगार मंत्रालय च्या वेबसाईट वर जाऊन आपले सेल्फ रजिस्ट्रेशन रकाण्यात आपला आधार लिंक मोबाईल नोंदवा व केपचा टाकून सेंड सेंड otp वर क्लिक करा (नोट रजिस्ट्रेशन करताना तुमचा आधारला मोबाईल क्र लिंक असणे गरजेचे आहे)
इंटर otp रकाण्यात आलेला OTP टाकून सबमिट बटन वर
क्लिक करा
या नंतर तुम्हाला तुमचा आधार क्र नमूद करणेचे
ऑप्शन येईल त्यात तुमचा आधार क्र भरा व सबमिट करा
त्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फोर्मेशन, पत्ता, एजुकेशन
व इनकम, व्यवसाय व कौशल्य, बँक डिटेल भरून सबमिट करा
सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचा इ श्रम कार्ड
डाऊनलोड चा ऑपशन दिसेल. तेथून तुम्ही इ श्रम कार्ड प्राप्त करू शकता
धन्यवाद........
0 टिप्पण्या
If have any doubts, please let me know