महाराष्ट्रात SC/ST/VJNT/OBC/SBC जातीचे प्रमाणपत्र 2023 कसे आणि कोठून मिळवायचे?

महाराष्ट्रात SC/ST/VJNT/OBC/SBC जातीचे प्रमाणपत्र 2023 कसे आणि कोठून मिळवायचे? 

जातीचा दाखला पाहिजे गावाला जा!



जातीचे प्रमाणपत्र कसे आणि कुठे मिळवायचे
जातीचे प्रमाणपत्र कसे आणि कुठे मिळवायचे


जात प्रमाणपत्र हे राज्य सरकारद्वारे नागरिकाला त्याच्या/तिच्या जातीची पुष्टी करणारे अधिकृत प्रमाणपत्र आहे.

आपले सरकार

आपले सरकार हा महाराष्ट्र सरकारने नागरिकांना ऑनलाइन प्रणाली द्वारे सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. नागरिक आपला अर्ज ऑनलाइन पद्धती ने नोंदणी करू शकतात आणि सबमिट करू शकतात आणि आपले सरकार वेबसाइटद्वारे त्यांच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा हि घेऊ शकतात. SC/ST/VJNT/OBC/SBC जात प्रमाणपत्र तसेच EWS (Economical Weaker Section) सर्टिफिकेट आपले सरकार वेबसाइटद्वारे अर्ज केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला प्रथम Aaple Sarkar वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.

 

कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसे करावे व्हिडिओ पहा




नियम :- जातीचा दाखला आपण त्या जिल्ह्यातून मिळवू शकतो ज्या जिल्ह्यात आपण मानक दिनांक येथील कायमचा रहिवास (Native) आहे.



समजा उदाहरणार्थ, सध्या आपण मुंबई/पुणे किंवा इतर जिल्ह्यात स्थलांतर होऊन स्थाईक झालो आणि आपला  कायमचा रहिवास (Native) हा मानक दिनांक ला जालगाव/सातारा किंवा इतर ठिकाण असेल तर आपल्याला जातीचा दाखला आपला मूळगाव (Native) च्या तहसील ला ऑनलाईन अर्ज करावे लागेल. 

थोडक्यात जातीचा दाखला पाहिजे गावाला जा!


आपल सरकार वेबसाइटवर नोंदणी व ऑनलाईन अर्ज आपले सरकार वेबसाइटला वरून करू शकता.

 

महाराष्ट्रात SC/ST/VJNT/OBC/SBC जात प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ

एकदा अर्ज सादर केल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास 28 दिवस लागतील.

 

विभाग आणि अधिकारी

जात प्रमाणपत्र तुमच्या मुळगाव जेथे ऑनलाईन अर्ज केला होता ते तहसीलदार प्रदान करतील. जारी केलेल्या प्रमाणपत्राबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

धन्यवाद.......







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या