गाव नमुना 14 व कोतवाल बुक एकच असते का?
| Caste Validity पोस्टाने येईल का? धर्म बदलण्याने
SC चे फायदे मिळतील का?
गाव नमुना 14 व कोतवाल बुक एकच असते का?
कोतवाल बुक व गाव नमुना १४ हे पुरावे जन्म मृत्यू असलेले डोकुमेंट आहे. काही महसुली विभात हे दस्त ऐवज कोतवाल बुक नावाने आणि काही विभागात गाव नमुना १४ नावाने मिळतात.
Caste Validity पोस्टाने येईल का
बार्टीच्या वेबसाईट https://bartievalidity.maharashtra.gov.in/ वरून अप्लाय केलेले SC,VJNT, OBC, SBC या मागास प्रवर्गाचे Caste Validity Certificate पोस्टाने येत नाही ते email वा तुमच्या लोगिन मधून डाऊनलोड करावे लागते.
मात्र eTribe Validity वेबसाईट https://etribevalidity.mahaonline.gov.in/ वरून अप्लाय केलेले ST प्रवर्गचे जात पडताळणी दाखले हे पोस्टाने तुमच्या घरी येते.
धर्म बदलण्याने SC चे फायदे मिळतील का?
जर बौद्ध धर्म स्वीकारला असेल तर अनुसूचित जातीचे फायदे मिळतात पण ख्रिश्चन वा मुस्लीम धर्म स्वीकारला तर SC च्या सवलती मिळत नाही.
0 टिप्पण्या
If have any doubts, please let me know