मूळ जात प्रमाणपत्र हरवले आहे व कास्ट व्हेलेडीटी आहे काय करावे | What If Caste Certificate Lost

मूळ जात प्रमाणपत्र हरवले आहे व कास्ट व्हेलेडीटी आहे काय करावे

What If Caste Certificate Lost

तुमचे जात प्रमाणपत्र हरवले असल्यास, काळजी करू नका, कारण तुम्ही नेहमी एकासाठी पुन्हा अर्ज करू शकता. तुम्ही एकतर ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज भरू शकता. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता तेव्हा तुम्ही त्याच चरणांचे अनुसरण कराल.

महाराष्ट्रात जातीचा दाखला हरवल्यास दुय्यम प्रत (Duplicate Caste Certificate) मिळण्याची कोणतीच प्रोसेस नाही. या साठी तुम्हाला आपल्या सरकार पोर्टल वर अथवा सेतू केंद्र अथवा महा इ सेवा केंद्र मधून अप्लाय करावा लागतो.

पण तुम्ही जात पडताळणी दाखला मिळवला असेल आणि तुमचा जातीचा दाखला हरवला असेल अश्या प्रसंगी तुम्हाला हरवलेल्या जातीच्या दाखल्याची झेरोक्स प्रत तुमचा संबंधित तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांचे कडून सर्टिफाय करून घेणे गरजेचे आहे. कारण पडताळणी दाखल्यावर सर्व माहिती हरवलेल्या जातीच्या दाखल्याची असते. त्याच बरोबर पोलीस स्टेशन चा FIR हि करावा लागेल. सर्टिफाय केलेला जातीचा दाखला अधिक FIR कॉपी असल्यावर नवीन Caste Certificate ची गरज नाही.

संपूर्ण माहिती साठी व्हिडिओ नक्की पहा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या