जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र ऑनलाइन कसे मिळवायचे - How To Get Caste Validity Online In Maharashtra

जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र ऑनलाइन कसे मिळवायचे 

How To Get Caste Validity Online In Maharashtra


जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र ऑनलाइन कसे मिळवायचे - How To Get Caste Validity Online In Maharashtra

Caste Validity Online In Maharashtra



ऑनलाइन जात वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र

शैक्षणिक संस्थेत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जात वैधता प्रमाणपत्र सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण कोटा तसेच राज्य सरकारमधील नोकरीतील बढती प्रदान करते. तसेच व्यावसाईक शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणे हे प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) किंवा भटक्या जाती व विमुक्त जमाती (VJNT) व इतर मागासवर्गीय (OBC)मधील लोकांना मदत करते. जातवैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्रासाठी त्यांचे महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र कसे मिळवायचे ते लाभार्थी https://bartievalidity.maharashtra.gov.in/  वेबसाईट वरून माहिती संकलन करून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

bartievalidity.maharashtra.gov.in वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज करा

विविध आरक्षित प्रवर्गातून वैद्यकीय, दंतचिकित्सा, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी आदींसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या 2021-22 या शैक्षणिक वर्षात 12वी विज्ञान आणि पदविका अभ्यासक्रमाच्या तिसर्या् वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज विहित नमुन्यातील सामाजिक न्याय विभागाकडे शैक्षणिक संस्थेच्या शिफारशींसह ऑनलाइन सादर करावे लागतील. अभ्यास करत आहेत.

विद्यार्थ्यांनी जात पडताळणी अर्जासह त्यांचे महाविद्यालयाचे शिफारस पत्र, फॉर्म 15 ‘वर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी मुद्रांक आणि चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, अथवा व्यावसायीक अभ्यासक्रम साठी सामाईक परीक्षा चे अप्लिकेशन (CET Application) आणि सर्व मूळ कागदपत्रांसह मानक दिनांक पूर्वीचा (Deemed Date) जातीचे पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपीसह कागदोपत्री पुराव्याची साक्षांकित प्रत जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.

मानक दिनांक SC करिता 10-08-1950, ST 06-09-1950,VJ & NT 21-11-1961, OBC & SBC 13-10-1967 असे आहे.

 

हे पण नक्की पहा

Caste Validity Of Blood Relative Then No Need To SubmitProof


विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला राखीव संवर्गातील कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना आतापासून जात पडताळणी समितीकडे याबाबतचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. विविध राखीव प्रवर्गातून वैद्यकीय, दंतवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी आदींसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (Professional Course) प्रवेशासाठी हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या बारावी विज्ञान शाखेत व पदविका (Diploma Course) अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज हा ते शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशींसह फॉर्म 15 A सामाजिक न्याय विभागाकडे ऑनलाइन करावयाचे आहे. सर्व डोकुमेंट हे मूळ दस्तावेज स्कॅन करून अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या आत सर्व अपलोड केलेले मूळ दस्तावेज व त्यांचे स्वयं सांक्षकीत संच संबंधित जात पडताळणी समिती मध्ये जमा करावा लागणार आहे.


बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात पडताळणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्य क आहे.




कास्ट व्हेलेडीटी चा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ नक्की पहा












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या